पिंपरी, दि. ८ (pimpri chinchwad crime) – पिंपरी – िंचचवड शहरात मोठ्या प्रमाणात होत
असलेल्या गांजाच्या तस्करीला लगाम लावण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या
पथकाला यश आले आहे. सव्वामहिनाभरापूर्वी गुन्हे शाखा युनिटने
हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी बाळगणार्या तीन जणांना अटक केली होती.
आता या तिघा आरोपींना गांजा पुरविणार्या मुख्य सुत्रधाराच्या पोलीसांनी
मुसक्या आवळल्या. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपीला हायड्रोपोनिक गांजा
परदेशातून एक जण पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस त्यांच्या
मागावर आहेत.
रोहित किशोर सुकेजा (वय ३४, रा. अशोका हाईटस, पिंपरी कॅम्प) असे अटक
केलेल्या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. त्याचे साथीदार अक्षय विजय मंथान
(वय २८, रा. पियुष पार्क, पिंपरीगाव), मयुर धनश्याम कपाटे (वय २५, रा.
अशोकनगर, पिंपरी), प्रतिक राकेश खैरनार (वय २७, रा. मुकाईनगर, हिंजवडी)
यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. पिंपरी – चिंचवड पोलिस
आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या नागरी वस्तीसह औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक
संस्था, आयटी पार्क, असंख्य लहान-मोठी हॉटेल्स आहेत. अनेक तरुण
वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेल्याचे समोर येते. त्यामध्ये अंमली
पदार्थ सेवन करणार्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हॉटेल,
हुक्का पार्लर यासह काही ठराविक ठिकाणी तसेच रस्त्यालगत गांजाचा झुरका
मारताना काही जण आढळतात.
शहरात प्रामुख्याने गांजा मध्यप्रदेश व ओरिसा
येथून येत असल्याचे तपासात वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. या गोष्टींना आळा
घालण्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
पोलीसाच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात
आहेत.
गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या
नेतृत्वाखालील पथकाने २५ फेब्रुवारी रोजी काळेवाडी येथे पाटीलवाडा
हॉटेलकडे जाणार्या सेवा रस्त्यावर अक्षय, मयुर आणि प्रतिक या तीन
आरोपींना हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरण्ाी जेरबंद केले
होते. आरोपींकडून २६.७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ९३ ग्रॅम साधा गांजा
आणि एक दुचाकी असा ३ लाख ५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला होता. चौकशीत आरोपींना रोहित सुकेजा हा गांजा पुरवित असल्याचे समोर
आले. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
अखेर ५ एप्रिल
रोजी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले. रोहित याचे
हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करण्याचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.
रोहित हा मुंबईतून गांजा आणायचा. तसेच, त्याला परदेशातूनही एक जण हा
गांजा पुरवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
