pimpri chinchwad-चिंबळी फाटा येथे कल्याण मटका जुगारावर कारवाई

पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – नाशिक-पुणे हायवे लगत हॉटेल महाराजा जवळ कल्याण मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मरकड यांनी सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. प्रतीक उत्तरेश्वर दुनघव (वय ३०, रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) आणि आकाश शिवाजी जाधव (वय ३०, रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आरोपी हे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *