pimpri chinchwad crime-माझ्याकडे का बघतो म्हणत रिक्षाचालकावर हल्ला

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – रिक्षात प्रवाशांची वाट पाहत बसलेल्या एका चालकाला ‘माझ्याकडे का बघतो’ असे म्हणून दोन तरुणांनी रिक्षाबाहेर ओढून लाकडी फळीने मारहाण केली. ही घटना रविवार (५ एप्रिल) दुपारी दोन वाजता, चांदखेड येथील बस स्टँड जवळ घडली.
याबाबत सनी शामराव गोटे (वय ४३, रा. मु. पो. चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. ५) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश भालेकर (वय २२) आणि वैष्णव भालेकर (वय २३, दोघेही रा. चांदखेड, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बस स्टँडवर रिक्षा लावून भाड्याची वाट पाहत होते. यावेळी कट्ट्यावर बसलेल्या आरोपींनी विनाकारण वाद उकरून काढला. त्यांनी फिर्यादीला रिक्षातून ओढून काढले आणि जवळच पडलेल्या लाकडी फळीने तसेच हाताने त्यांच्या छातीवर व पोटावर मारहाण करत शिवीगाळ केली. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *