(pimpri chinchwad crime)-निगडी येथील यमुनानगर परिसरात एका हॉटेल चालकाकडे मी गुन्हेगार आहे, असे सांगत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.
ही घटना शनिवारी (४ एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास खान्देशी तडका हॉटेल, यमुनानगर, निगडी येथे घडली.
या प्रकरणात २३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल प्रल्हाद देवकर (३२, बोदवड, जि. जळगाव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल देवकर हा फिर्यादीच्या हॉटेलमध्ये आला. त्याने ‘मी गुन्हेगार आहे’ असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. हॉटेल व्यवस्थित चालवायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली.
पैसे न दिल्यास हॉटेल तोडून टाकण्याची आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
