(pimpri chinchwad)-आळंदी येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे एक मजुर पडला. ही घटना रविवार (२२ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील भाजी मार्केट परिसरात घडली. तर मजुराचा २९ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुभाष प्रल्हाद हारीमकर (२७) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार बांधकाम ठेकेदार वैभव कस्पटे (आळंदी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या पहिल्या मजल्यावर स्लॅबचे काम सुरू असताना ठेकेदाराने मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही संरक्षक जाळी लावली नव्हती.
तसच कामावर असलेल्या मजुरांना हेल्मेट किंवा सेफ्टी हार्नेस सारखी उपकरणे पुरवली नव्हती. याच निष्काळजीपणामुळे सुभाष हारीमकर हा मजूर उंचावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
उपचार सुरू असताना २९ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
