पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून ‘कॅपिटल मोंक्स’ नावाच्या ॲपद्वारे एका व्यक्तीची नऊ लाख ७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांगवी परिसरात घडली.
याप्रकरणी जयेश पाटील, दोन महिला आरोपी आणि संबंधित लिंक/बँक खातेधारक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी येथील एका पुरुष फिर्यादीने गुरुवारी (दि. २ एप्रिल) रोजी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घअना डिसेंबर २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सांगवी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क करून ‘कॅपिटल मोंक्स’ कंपनीची माहिती दिली आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीने आरोपींनी दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड केले आणि नऊ लाख सात हजार ५०० रुपये गुंतवले. ॲपमध्ये ही रक्कम ९० लाख रुपये झाल्याचे दिसत होते, मात्र जेव्हा फिर्यादीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे निघाले नाहीत आणि आरोपींनी आपले फोनही बंद केले.
पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी करीत आहेत.
