pimpri chinchwad crime-चिखलीत गांजा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी, दि. २७(pimpri chinchwad crime) – चिखलीतील जाधववाडी परिसरात गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडून१० हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्‍त करण्‍यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास करण्यात आली.

अविनाश धनाजी गोरे (वय १९, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार सिद्धार्थ तायडे (रा. अजिंठानगर, निगडी) याच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या प्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार कपिलेश कृष्णा इगवे यांनी गुरुवारी (दि. २६ मार्च) रोजी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास आरोपी अविनाश गोरे याच्‍याकडून २१० ग्रॅम वजनाचा १० हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. त्‍याच्‍याकडे मिळालेल्‍या गांजाबाबत चौकशी केली सअता त्‍याने तो गांजा आरोपी सिद्धार्थ तायडे याच्‍याकडून विक्रीसाठी आणला असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. या प्रकरणाचा तपास चिखली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *