pimpri chinchwad crime-चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांवर गुन्‍हा

पिंपरी, दि. १ ( pimpri chinchwad crime ) – चाकण-तळेगाव रोडवरील नाणेकरवाडी येथे रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

​याप्रकरणी वाल्मिक पुंडलिक लांजेवार (वय २९, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. भंडारा) आणि जीवन बळीराम राठोड (वय २४, रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार निखिल बाळासाहेब यांनी मंगळवारी (दि. ३१) याप्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तळेगाव चौक परिसरात पत्त्यावर आकडे लिहून हात चलाखी करीत लोकांकडून पैसे गोळा करून जुगार खेळवत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिथे छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन हजार २०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून, सहायक पोलीस फौजदार मोरे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *