पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad crime) – चऱ्होली बुद्रुक येथील आझाद चौक परिसरात बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मोबाइल, रोकड आणि दुचाकीसह एकूण एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस शिपाई शशिकांत देवराम नांगरे यांनी शुक्रवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आकाश शंकर तापकीर (वय ३०, रा. चोविसावाडी, चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे), सुमित उर्फ बाळू येवले (रा. श्रीराम कॉलनी, चऱ्होली), अनिल तापकीर (रा. चोविसावाडी, चऱ्होली) आणि प्रतीक कदम (रा. निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद चौकातील एका वॉशिंग सेंटरच्या शेजारी आरोपी मोबाइलवर मटका जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी आकाश तापकीर हा इतरांच्या सांगण्यावरून मटका घेत असताना रंगेहात मिळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक ॲपल आयफोन, रोख रक्कम आणि एक ज्युपिटर मोटारसायकल असा एकूण एक लाख १४ हजारांचा ऐवज जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
