pimpri chinchwad crime-दारूचे पैसे उद्या देतो म्हटल्याने रिक्षाचालकाला मारहाण

पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – हॉटेलमधील बिअरचे १०० रुपये उद्या देतो असे म्हटल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि तीन वेटर यांनी मिळून एका रिक्षाचालक ग्राहकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रात्री ११.३० वाजता, हॉटेल मावळ गेट, साईनगर, गहुंजे येथे घडली.

याप्रकरणी अमित आनंद पोटगुळे (वय ४५, रा. मामुर्डीगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. ५) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण गोरख ठोंबरे (रा. हॉटेल मावळ गेट, मामुर्डी) आणि त्‍याचे तीन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने बिअरचे पैसे उद्या देतो असे सांगितल्याचा राग आरोपींना आला. त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे फिर्यादीच्या हनुवटीला जखम झाली असून उजवा डोळा काळा पडला आहे. तसेच जबडा आणि छातीला मार लागून उजव्या पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *