पिंपरी- चिंचवडमध्ये (pimpri chinchwad crime) :- “हायड्रोपोनिक गांजा”च्या वाढत्या वापरामुळे तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा गांजा परदेशातून मोठ्या प्रमाणावर भारतात येत असून, त्याची नशा पारंपरिक गांजापेक्षा अनेक पटीने अधिक तीव्र असल्याचे सांगितले जाते. तणाव, नैराश्य किंवा कुतूहलामुळे अनेक तरुण या अमली पदार्थाकडे वळताना दिसत आहेत.
मात्र, हा ट्रेंड अत्यंत धोकादायक ठरत असून आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मानसिक संतुलन बिघडणे, व्यसनाधीनता वाढणे आणि शारीरिक हानी होण्याचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नार्कोटिक्स विभागाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे की, हायड्रोपोनिक गांजा शरीरासाठी अत्यंत घातक आहे आणि त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे.
महेश पाटील
,पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड
