(pimpri chinchwad crime)-दारूच्या नशेत असलेल्या पतीने पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले, असे म्हणत पत्नीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री १० वाजेच्या सुमारास पवार नगर कॉलनी, थेरगाव येथे घडली.
या प्रकरणी जखमी महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशोर सुभाष वाघमारे (३५, थेरगाव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर वाघमारे याने दारूच्या नशेत घरी येऊन त्याची पत्नी फिर्यादी सोबत वाद घातला. फिर्यादीने त्याचे पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात फेकले, असा संशय घेऊन त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
संतापाच्या भरात त्याने घरातील गॅस शेगडीवरचे लोखंडी स्टँड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारले, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
