पिंपरी, दि. १० (pimpri chinchwad) – एका मजुराच्या मोबाइलचा पासवर्ड आणि फोन पे चा वापर करून त्याच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये चोरले. ही घटना मावळ तालुक्यातील चांदखेड परिसरात मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी घडली.
जितराम बुनकर (वय ३९, रा. चांदखेड, मावळ) यांनी गुरुवारी (दि. ९ एप्रिल) रोजी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबुलाल यादव (वय २४) आणि नारायणदास यादव (वय २१, दोन्ही रा. मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे असून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मोबाइलचा पॅटर्न आणि पासवर्ड चोरून मिळवला. त्यानंतर त्यांच्या परस्पर फोन पे खात्यातून ५० हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली.
शिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
