pimpri chinchwad crime-प्रियकरासोबत मिळून पोटच्या मुलाची हत्या; ह्दयविकाराचा बनाव उघड

​पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्‍याने जन्‍मदात्‍या आईनेच आपल्या ६ वर्षांच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही घटना ४ एप्रिल रोजी खेड तालुक्‍यातील कुरुळी येथे घडली. मुलाच्‍या हत्‍येनंतर त्‍याला ह्दयविकाराचा झटका आल्‍याचा बनाव केला. मात्र आजोबांना शंका आल्‍याने त्‍यांनी पोलिसांना पाचारण करून बनाव उघडकीस आणला.

आवेज मेहबुब शेख (वय ६) असे खून झालेल्‍या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी त्‍याची आई बसरीन मेहबुब शेख (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) हिला अटक केली आहे. तर तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी) याच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला असून पोलीस त्‍याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मुलाचे आजोबा इसाक महमद शेख (वय ४९, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बसरीन आणि राम कजेवाड यांच्या प्रेमसंबंधात आवेज मेहबुब शेख (वय ६) हा अडथळा ठरत होता. याच कारणातून दोघांनी संगनमत करून आवेजचे डोके बाथरुममधील पाण्याच्या बादलीत दाबून धरले आणि भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याला जिवंत ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मुलाचा मृतदेह बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. मात्र, फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.

शवविच्छेदनानंतर हा खुनाचा प्रकार समोर आला. दक्षिण म्हाळुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *