pimpri chinchwad-जुन्या वादातून चुलत भावाला मारहाण
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – जुन्या वादाच्या कारणावरून चुलत भावानेच तरुणाला मोरवाडी कोर्टाजवळ बोलावून सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ४ एप्रिल) रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली.
सद्दाम राजू पठाण (वय २६, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी फिर्यादी यांचा चुलत भाऊ शकील बहादूर पठाण (वय ३१, रा. अजमेरा, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मोरवाडी कोर्टाजवळ बोलावून घेतले.
तिथे दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला आणि आरोपीने सिमेंटचा गट्टू व लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली. जखमी फिर्यादीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. संत तुकारामनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.