pimpri chinchwad-बांधकाम सुरू असलेल्‍या इमारतीवरून पडल्‍याने कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा

पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – पुनावळे येथील पुनेविल्‍ले या बांधकाम साईटवर सेंट्रिंगचे काम करताना खाली पडल्याने एका ४५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. सुरक्षेची पुरेशी साधने पुरवली नसल्याचा ठपका ठेवत रावेत पोलिसांनी साईट कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास घडली.

​उत्पल मनीकांत अधिकारी (वय ४५, सध्‍या रा. काटेवस्‍ती, पुनावळे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी मयताची पत्नीने शुक्रवारी (दि. २७) याबाबत रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंत्राटदार पंकज पुलीन मंडल (रा. मारुंजी, मूळ- पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनेविल्ले कन्स्ट्रक्शन साईटवर काम सुरू असताना उत्पल अधिकारी हे उंचावरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कंत्राटदाराने सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी जाळी, सुरक्षा जॅकेट किंवा इतर आवश्यक साधने कामगारांना दिली नव्हती. कामगारांच्या जीवाचा धोका माहित असूनही दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *