pimpri chinchwad crime – वायसीएम रुग्णालयातील वार्ड बॉयची राहत्या घरी आत्महत्या

(Pimpri chinchwad crime) पिंपरी येथे वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२७ मार्च) नेहरूनगर येथे घडली.

संदीप राघोजी नलवडे (३५, नेहरूनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे.

संत तुकाराम नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नवलडे हे रूग्णालयात मध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला होते.

त्यांना दारूचे व्यसन होते. घरगुती भांडणावरून त्यांनी शुक्रवारी दारूच्या नशेत एक लिटर कीटकनाशक पिले. त्यांना तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *