पिंपरी, दि. २७ (pimpri chinchwad crime) – महाळुंगे येथील घाटे वस्ती परिसरात दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन चोरट्याने एका व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे चार लाख ४४ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २६ मार्च) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रुपेश आंबुदास कौटकर (वय ३८, रा. काळुस, ता. खेड) यांनी गुरुवारी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अॅक्टिव्हावरून आपला पोकलंड चालकसोबत जात होते. ते महाळुंगे येथील घाटे वस्ती परिसरात आले असता आरोपीने मागून दुचाकीवरून येत फिर्यादी रुपये कोटकर यांच्या गळ्यातील ३४.९८० ग्रॅम वजनाची चार लाख ४४ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून पळ काढला.
या प्रकरणाचा तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.
