pimpri chinchwad crime-चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटख्‍याचा साठा जप्त; अन्न सुरक्षा विभागाची कारवाई

पिंपरी, दि. २८(pimpri chinchwad crime) – महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी चिंचवड येथील एका पान टपरी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी सायली सुरेश पटवर्धन (वय ४०) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल कुमार अशोक मिश्रा (वय ३२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील ‘मे. लक्ष्मी पान शॉप’ येथे अन्न सुरक्षा विभागाने छापा टाकला.

यावेळी शासनाने प्रतिबंधित केलेला एकूण सहा हजार ९४१ रुपये किमतीचा सुंगधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा मिळून आला. सार्वजनिक आरोग्यासाठी घातक असलेल्या या पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही हा साठा केल्याने आरोपीवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीप करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *