pimpri chinchwad crime-हिंजवडीत महिलेवर सामूहिक अत्याचार; महिलांसह दहा आरोपींवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – हिंजवडी परिसरात एका महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दहा जणांच्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मारुंजी रोड परिसरातील एका घरात ही घटना घडली.

शशिकांत लक्ष्मण साखरे आणि किरण शशिकांत साखरे यांनी इतर सहआरोपींच्या मदतीने महिलेचा जबरदस्तीने घरात ओढून नेऊन चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. या वेळी अनिल विठ्ठल बोत्रे, अक्षय साखरे तसेच तीन महिला व इतरांनी महिलेचे हातपाय धरून आरोपींना मदत केल्याचे समोर आले आहे.

तसेच, घटनेनंतर पीडितेला “प्रकरणाची माहिती दिल्यास कुटुंबियांसह जीवे मारू” अशी धमकी देण्यात आली.

आरोपींनी तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिल्याने पीडित महिला दीर्घकाळ मानसिक तणावाखाली होती. अखेर धैर्य एकवटून तिने पतीला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *