एप्रिल 2026 च्या अखेरीस आणि में महिन्याच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्राबरोबरच भारताच्या 57% जिल्हे हे उच्च तापमानाच्या प्रभावा खाली आहेत, तर जगातील 100 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी 90 हून अधिक शहरे ही भारतात आहेत, काही शहरांमधे तापमान 40 ते 45 अंशाच्या मध्ये असल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत, त्या मुळे आता उर्वरित मे महिन्यात असणारे तापमान आणि येणारा पावसाळा या बाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे , अशातच एक दिलासा देणारा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे, हवामान विभागाच्या माहिती नुसार, दक्षिण बंगालच्या उपसागरात, अंदमान समुद्रात तसेच अंदमान निकोबार बेटांजवळ सध्या मान्सून करिता आवश्यक असणारे पोषक वातावरण तयार झाले असून मौसमी पाऊस या आठवड्याच्या अखेरीस अंदमान भागात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जर हा अंदाज खरा ठरला तर यंदा अंदमान मध्ये मॉन्सून चे आगमन हे चार ते पाच दिवस आधी होऊ शकते, अंदमानात स्थिरावल्या नंतर तो पुढे भारताच्या मुख्य भूमिकडे सरकून साधारण 1 जून च्या आसपास केरळ मध्ये दाखल होतो आणि त्या नंतर 10 ते 12 दिवसांत महाराष्ट्रात पोचतो,त्यामुळे सर्व परिस्थिती अनुकुल राहिल्यास महाराष्ट्रात 15 ते20 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
परंतू साधारणपणे 22 में च्या आसपास अंदमानात पोचणाऱ्या मॉन्सून ने गेल्या वर्षी मात्र 13 मेला च तिथे हजेरी लावली होती. त्यामुळे ह्या वर्षी तो तिथे कधीपर्यंत दाखल होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
दरम्यान आतापर्यंतच्या अंदाजा नुसार यंदाच्या पावसाळ्यावर एल निनो चा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने सरासरीच्या 92% इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर मे महिन्याच्या अखेरीस हवामान विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या सुधारीत अंदाजा नंतरच पावसाचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल .
दरम्यान ,बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे, हि प्रणाली सध्या सक्रिय असून पुढील काही दिवसात ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून त्याचा मान्सून च्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तद्न्यां कडून व्यक्त केली जात आहे
15 ते 20 जून च्या दरम्यान मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
