बेंगळुरू : नीट पुनर्परीक्षा रविवारी दुपारी २ वाजता सुरू झाली असून ती सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्यान, बेंगळुरू येथील आरसी गव्हर्नमेंट कॉलेज परीक्षा केंद्रावर एक भावनिक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
नियमांनुसार दुपारी १.३० वाजता परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. याचवेळी एका परीक्षार्थीला केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी धावपळ करावी लागल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी वेळेचे नियोजन आणि परीक्षा नियमांचे पालन किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे
