London-महिला टी-२० विश्वचषकातून पाकिस्तानचा पत्ता कट; स्पर्धेबाहेर जाणारा पहिला संघ

लंडन : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून संघाचे उपांत्य फेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. खराब कामगिरीमुळे पाकिस्तान महिला संघ स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे.

गट टप्प्यातील सलग पराभव आणि कमी गुणसंख्येमुळे पाकिस्तानला बाद फेरीचे तिकीट मिळवण्यात अपयश आले. यामुळे स्पर्धेतील त्यांचा प्रवास गट फेरीतच संपुष्टात आला आहे. नेदरलँड्स संघालाही स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू असून, संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील सातत्याच्या अभावामुळे ही वेळ आल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महिला विश्वचषकातील या निकालामुळे गुणतालिकेचे चित्रही अधिक स्पष्ट झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *