Pimpri chinchwad crime-दापोडीत तरुणांवर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा

पिंपरी, दि. २७ (Pimpri chinchwad crime) – दापोडी येथील जयभीम नगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून सहा जणांनी एकत्र येत दोन तरुणांवर लोखंडी रॉड, बांबू व बिअरच्या बाटल्यांनी हल्ला करून जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. ही घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

सनि गजभिव (वय २८), नन्या उर्फ जयप्रकाश पंडीत (वय २२), संदेश गजभिव (वय २३), रोहन बनसोडे (वय २३), डेविड उर्फ मोन्या पाटोळे (वय २२), प्रथमेश चलवारे (वय २४, सर्व रा. जयभीम नगर, दापोडी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. महेश पवन गुळवे (वय २२, रा. एप्रे चाळ, दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी गुरुवारी (दि. २६) याबाबत दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमविला. त्‍यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र आकाश पिंजन यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी आकाशला खाली पाडून गळा दाबण्याचा प्रयत्न केला तसेच सिमेंट गट्टू, लोखंडी रॉड, बांबू व बाटल्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करीत जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच साहिल लांडगे व रुपेश कांबळे यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेतील आरोपी सनी गजभिव वगळता इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास दापोडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *