नवी दिल्ली(delhi) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर देशातील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. केंद्र सरकारने सात नव्या बुलेट ट्रेन मार्गांना तत्त्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
देशातील प्रमुख शहरांना अतिवेगवान रेल्वे सेवेद्वारे जोडण्याच्या उद्देशाने हे नवे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असताना आता नव्या मार्गांनाही मंजुरी मिळाल्याने देशातील आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
