pimpri chinchwad crime-उर्से येथे बेकायदेशीर देशी दारूची विक्री; सव्वा लाखाचा माल जप्त

पिंपरी, दि. २८(pimpri chinchwad crime) – मुंबई-पुणे हायवे जवळील उर्से येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे एक लाख ४३ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

​गुन्‍हे शाखेच्‍या मालमत्‍ता विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रविण प्रकाश कांबळे यांनी शुक्रवारी (दि. २७ मार्च) रोजी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमर बाबुराव वरकट (वय ४०, रा. उर्से, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से येथील एका शेडमध्ये आरोपी विनापरवाना देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक लाख ४३ हजार रुपये किंमतीच्‍या ‘पॉवर लाईम पंच’ नावाच्या देशी दारूच्या १८० आणि ९० मिलीच्या अनेक बाटल्या सापडल्या.

स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला समजपत्र देण्यात आले आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बगाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *