Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे धरणातून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर खडकवासला धरणही ९५ टक्के भरल्याने पुढील काही तासांत सांडव्यातून पाणी सोडण्याची दाट शक्यता…
राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे रस्त्याचा मोठा भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने…
Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील ४.१०४ हेक्टर…
बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना केशवनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी बेकरी चालक समशेर जाकीर अन्सारी (वय ४०, रा. श्रीराम कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) याच्याविरुद्ध…
दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने पकडले. ही कारवाई बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ०९.२५ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील येलवाडी येथे करण्यात आली. गुंजन शंकर राठोड (वय…
बँक खाते वापरण्यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी वापरू दिल्याचा आणि चेकद्वारे ११ लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. पेन्नी हेन्री पॉवेल (धारक:…
इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबवली
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही चोरी दि. २० जुलै रोजी सायंकाळी ८:०० ते दि. २१ जुलै रोजी सकाळी ०७:०० या वेळेत पिंपळे गुरव येथील जवळकरनगर परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात…
बिल्डिंग साइटवरून अॅल्युमिनियम तारांची चोरी
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बांधकाम साइटच्या स्टोअररूममधून एक लाख ५ हजार ६०० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारा चोरून नेल्या. ही घटना दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली. अतुल शंकर शिंगाडे…
भरधाव ट्रेलर्स पलटी होऊन चालक जखमी
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात चालवलेला ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये केबिन तुटून नुकसान झाले. तसेच चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ०२.३० वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे मंगरुळ रोडवर सीकोम…
तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीस अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दारू पिताना झालेल्या भांडणानंतर एका तरुणाचा डोक्यात वार करून आणि हात- पाय-कंबर वायरने बांधून विहिरीत फेकून देत खून केला. ही घटना २२ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजण्यापूर्वी मुळशी तालुक्यातील नेरे येथील मेमाणे वस्तीत घडली.…