pimpri chinchwad crime-भांडणात मध्‍यस्‍थी करणा-या भंगार विक्रेत्यावर चाकूने हल्ला

पिंपरी, दि. २९ (pimpri chinchwad crime) – आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका भंगार विक्रेत्यावर चाकूने वार करून जखमी करण्‍यात आले. ही घटना रावेतमध्ये शुक्रवारी (दि. २७) दुपारी अडीच वाजताच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महादेव दिलीप बिरादार (वय ४५, रा. शिंदे वस्ती, रावेत, मूळ रा. कर्नाटक) असे चाकू हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या भंगार विक्रेत्‍याचे नाव असून त्‍यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी याबाबत रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. अनिल हौसिलाल चव्हाण (वय २८, रा. धर्मराज चौक, रावेत, मूळ रा. परभणी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास रावेत येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रोडवर एका होंडा शोरूमसमोर फिर्यादीचे ओळखीचे अनिल चव्हाण आणि शेलार यांच्यात भांडण सुरू होते.

बिरादार हे मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेले असता, त्याचा राग मनात धरून आरोपी अनिल याने शिवीगाळ करत जवळ असलेल्या चाकूने बिरादार यांच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार केले. रावेत पोलीस ठाण्‍यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *