pimpri chinchwad crime-साडेसहा लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त; दोन तरुण अटकेत

​पिंपरी, दि. २९(pimri chinchwad crime) – म्हाळुंगे-बावधन परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्‍या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला आहे.

​याप्रकरणी गुन्‍हे शाखा युनिट दोनच्‍या पथकातील पोलीस शिपाई सुखदेव सूर्यभान गावंडे यांनी शनिवारी (दि. २८) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौरव रमेश कुंते (वय २४, रा. बावधन, मूळ रा. बुलढाणा) आणि विवेक सुनील चौधरी (वय २१, रा. बावधन, मूळ रा. जळगाव) या दोघांना अटक केली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सव्‍वातीन वाजताच्‍या सुमारास म्हाळुंगे येथील स्कायवे सोसायटीसमोर काही तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून केलेल्या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून ६० ग्रॅम वजनाचा महागडा हायड्रोपोनिक गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोबाइल जप्त करण्यात आला. बावधन पोलीस ठाण्‍यातील पोलीस उपनिरीक्षक साळुंखे याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *