पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास बावधन येथील मुंबई-बेंगलोर हायवे सर्व्हिस रोडवर करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी मंगळवारी (दि. ३१ मार्च) रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ग्रीन पार्क लॉजच्या शेजारील पत्र्याच्या शेडसमोर एक महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना खुणावत होती. तिच्या या कृत्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभ्यता आणि शिष्टाचाराचा भंग होत असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
