अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडून हिंजवडी पोलिसांनी 27 लाखांचा MD केला जप्त; वाकड, गोवंडीत केली कारवाई
पुणे : वाकड येथे एम डी विक्रीसाठी आलेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४२ ग्रॅम एम डी जप्त केला. अधिक चौकशीत त्याचा साथीदाराला मुंबईतील गोवंडी येथून पकडून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा २०० ग्रॅम एम डी जप्त केला आहे.
अतुल शंकर बालगुडे Atul Shankar Balgude (वय ३५, रा. पाथरगाव, ता. मावळ) आणि शाहरुख ऊर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी Shahrukh Alias Saddam Iqbal Ansari (रा. गोवंडी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
