pimpri chinchwad-पाण्याच्या उघड्या टाकीत पडल्याने चिमुकलीचा अंत

(pimpri chinchwad)-जुनी सांगवी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत पडून एका पावणे चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३१ मार्च) रात्री दत्त मंदिर, पवनानगर लेन १ येथे घडली.

प्रियंका मनोज विश्वकर्मा (३ वर्षे ९ महिने) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत मनोज उज्जैन विश्वकर्मा (२२, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मनीष बाबासाहेब पवार, जयराम बबनराव कांबळे आणि वसंत कैलास बनसोडे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका ही परिसरात खेळत असताना आरोपींच्या मालकीच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या उघड्या टाकीत पडली.

आरोपींना या टाकीमुळे जीवितहानी होऊ शकते याची कल्पना असतानाही त्यांनी त्यावर कोणतेही झाकण किंवा सुरक्षेचे उपाय केले नव्हते. या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *