पिंपरी, दि. ३ pimpri chinchwad) – शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ५८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना रावेत परिसरात घडली.
याप्रकरणी विवेक जगदेवराव शिंदे (पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लेगसी फाॅच्युर्न एक्झाॅटिका, मुकाई चौक, चंद्रभागा कॉर्नरजवळ रावेत येथील एका महिलेने गुरुवारी (दि. २) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विवेक शिंदे याने फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये मोठा फायदा करून देतो असे खोटे आमिष दाखवले.
सुरुवातीला फिर्यादी महिलेला डिमॅट अकाउंटमध्ये फायदा होत नसल्याने आरोपीने “तुम्ही मला पैसे ट्रान्सफर करा, मी माझ्या अकाउंटवरून गुंतवणूक करून तुम्हाला फायदा देतो” असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून वेळोवेळी २० लाख ५८ हजार रुपये घेतले. मात्र कोणताही परतावा न देता आरोपीने फसवणूक केली. पुढील तपास रावेत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खिळे करीत आहेत.
