pimpri chinchwad-कुरुळीत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवरील वेलकम लॉजसमोर करण्‍यात आली.

या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब पवार यांनी सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन महिला आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) नुसार गुन्‍हा दाखल करीत नोटीस बजावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी महिला आरोपींनी वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा भंग केला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *