pimpri chinchwad-कारची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी देहूरोड ते तळवडे दरम्यान घडली.

वेदांत यशवंत भुजबळ (वय २७, रा. यशोनिल बंगलो, आयडील कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कार चालक अथर्व गणेश तापडीया (रा. सदाशिव पेठ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या बजाज चेतक दुचाकीवरून (एमएच 12 एक्सजे 6040) जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील किया सोनेट कार (एमएच 12 टीएन 3533) अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे चालवून धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायाला आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *