(pimpri chinchwad crime)-देहुगाव परिसरात जुन्या वादातून एका रिक्षा चालकाला अडवून त्याला आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्याराने जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चव्हाणनगर, देहुगाव येथे घडली.
या प्रकरणी रोहित संतोष भोसले (२१, विठ्ठलवाडी, देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत जाधव (२२, चव्हाणनगर), पवन जाधव (२०, चव्हाणनगर), युवराज जाधव (२२, चव्हाणनगर) आणि ओम (२०, चव्हाणनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत जाधव याने फिर्यादी रोहित यांना हाक मारून थांबवले. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांना व त्यांच्या मित्राला मारहाण केली. यावेळी आरोपी ओम याने हातातील हत्याराने रोहित यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करून त्यांना जखमी केले. “तुला बघून घेतो” अशी धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाले. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.
