(pimpri chinchwad crime)-चऱ्होली बुद्रुक येथे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले.
ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चऱ्होली ते लोहगाव रस्त्याच्या कडेला करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद विंचू यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आर्यन कृष्णा रसाळ (१९, चऱ्होली बु.) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन रसाळ हा चऱ्होली परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे २७ हजार ४०० रुपये इतकी आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
