वाढत्या उन्हाचा फटका! तळेगाव स्टेशनजवळ पेट्रोल टँकरचा भडका, परिसरात घबराट

पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डिझेल टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भारत पेट्रोल पंपावर डिझेल खाली करत असताना ओव्हरहीटिंगमुळे टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत टँकरला कवेत घेतलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. मात्र, थोडासा उशीर झाला असता तर मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या भीषण आगीचा व्हिडिओ समोर आला असून घटनेची तीव्रता त्यातून स्पष्ट दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *