पिंपरी स्मशानभूमी परिसरात अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली.
या प्रकरणात प्रतापसिंग (वय ५४, मूळ रा. मध्‍य प्रदेश) आणि अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे यांनी बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असताना एका अल्पवयीन मुलाकडे ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्टल मिळून आली. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान त्याने ही पिस्टल प्रतापसिंग नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रतापसिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस याबाबतअधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *