येलवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळवणाऱ्या दोन जणांवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ५:१० वाजण्याच्या सुमारास येलवाडी येथे केली.
पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र खेडकर यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज मुरलीधर गाडे (वय २८, रा. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) आणि दिनेश वरसू चव्हाण (वय ४०, रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी येलवाडी परिसरात कल्याण मटका नावाचा जुगार चालवत होते. लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून दोन हजार ७२० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *