वसुली एजंटकडून शेतकाऱ्यावर चाकूने वार; वाहनाचीही तोडफोड

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गाडी अडवून हप्ते न भरल्याच्या कारणावरून एका शेतकाऱ्यावर चाकूने वार कले. तसेच गाडीची काचही फोडली. ही घटना रविवारी (दि. १९ एप्रिल) दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीवाडी चौक, मोशी येथे घडली.
संदीप सोपान कड (वय ३८, रा. संतोष नगर, वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश तानाजी जाधव (वय २५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (वय ३०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि सुरज तुकाराम कुसाळकर (वय २५, रा. दुर्गामाता चौक, चिंचवड) या तीन रिकव्हरी एजंटना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. गाडीचे हप्ते का भरले नाहीत, या कारणावरून त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीची काच फोडून फिर्यादीच्या उजव्या दंडावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *