पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – हिंजवडी येथील इन्फोसिस सर्कलजवळ एका दुचाकीने कारला धडक देऊन नुकसान केले. याबाबत जाब विचारला असता दुचाकीवरील पिता-पुत्रीनु कारमधील महिलेला धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. २२ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी वरध मनोज पितळे (वय १९, रा. सूसगाव, पुणे) यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिव्या पंढरीनाथ उकीरडे (वय १९, रा. माण, ता. मुळशी) आणि पंढरीनाथ उकीरडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या कारने (MH 12 PC 0471) आईला आणण्यासाठी जात चालले होते. त्यावेळी आरोपी दिव्या उकीरडे हिने आपल्या दुचाकीने (MH 14 MU 5488) फिर्यादी वरध त्यांच्या कारला धडक दिली. यात कारच्या मागील दरवाजाचे व बंपरचे नुकसान झाले. फिर्यादीच्या मावशीने याबद्दल विचारले केली. यामुळे संतापलेल्याआरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. तसेच आरोपींनी त्यांना “तुम्हास काय करायचे ते करा” अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेले. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
वाहन अपघातात दुचाकीस्वारांची दादागिरी; कारचेही नुकसान
