गांजा विक्री करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बघलवाडी येथे विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री पावणे आठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
पोलीस अंमलदार भिमराव खिलारे यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. दत्ता सोपान बधाले (वय ५६, रा. बघलवाडी, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झाल्‍यावर अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुक्ताई गुरुवारी रात्री पावणे आठ वाजताच्‍या सुमारास मंदिराजवळ गांजा विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून २१ हजार १०० रुपये किमतीचा ४२६ ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *