Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-एम्पायर इस्टेटमध्ये कुत्र्यांचा प्रश्न चिघळला

By Sumedh Chapalgaonkar
April 24, 2026 2 Min Read
0

चिंचवड, दि. २४ (pimpri chinchwad) एम्पायर इस्टेटमध्ये कुत्र्यांचा प्रश्न चिघळला; नागरिक थेट महापौरांकडे धावले
महिनाभरात ८ जणांना चावा; रहिवासी आणि डॉग फीडर्स आमनेसामने, दालनातच वाद

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या महिनाभरात आठ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने संतप्त रहिवाशांनी थेट महापौरांच्या दालनात धाव घेतली. यावेळी नागरिक आणि डॉग फीडर्स यांच्यात तीव्र वाद झाला.

सोसायटीतील परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहे. एका बाजूला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसऱ्या बाजूला प्राणीप्रेमी कुत्र्यांच्या संरक्षणासाठी भूमिका मांडत आहेत. दोन्ही गट आमनेसामने आल्याने वातावरण तापले. महापौर रवि लांडगे यांच्या दालनात बुधवारी हा वाद उफाळून आला. आरोप-प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण झाली.

स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. त्यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही गटांना शांत केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौरांनी प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. सोसायटी परिसरात निश्चित डॉग फीडिंग पॉईंट उभारण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकृत फीडर्सची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचे सांगितले. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहीम गतीने राबवण्यावर भर देण्यात आला. नागरिकांच्या तक्रारींवर २४ तासांत प्रतिसाद देण्याचेही आदेश देण्यात आले.

दरम्यान, या भागातील लोकप्रतिनिधींवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वेळेत लक्ष दिले नसल्याने परिस्थिती चिघळल्याचा आरोप करण्यात आला. “सतत तक्रारी करूनही काहीच झाले नाही. आता लोकांचा संयम संपत चालला आहे,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनीही प्रशासनावर टीका केली. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे भीती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेने आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही गटांमध्ये तणाव कायम आहे. त्यामुळे हा वाद शांत होतो की आणखी वाढतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Tags:

Dog Issue Escalates at Empire Estate
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

मोकळ्या जागा बनल्या डम्पिंग पॉईंट; दुर्गंधी, रोगराईमुळे नागरिक संतप्त ‘स्मार्ट’ शहराची घसरलेली प्रतिमा; पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचा विळखा घट्ट

Next

pimpri chinchwad-पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme