घरभाड्याच्या वादातून चौघांना फळीने बेदम मारहाण

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – घरभाड्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांना खिळे असलेल्या लाकडी फळीने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्‍यात आले. ही घटना रविवारी (दि. २६) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे घडली.
जयश्री बाळू जाधव (वय ४५, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सारिका सुभाष बोऱ्हाडे (वय ४०), आदित्य सुभाष बोऱ्हाडे (वय २०) आणि निशा सुभाष बोऱ्हाडे (वय १८, सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपीने घरात घुसून घरभाड्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने खिळे असलेली लाकडी फळी आणून फिर्यादी आणि पूजा यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच, सारिका बोऱ्हाडे हिने सासू सावित्राबाई यांना मारहाण केली, तर निशा बोऱ्हाडे हिने लोखंडी रॉडने फिर्यादीचा भाऊ मंगेश याच्या डोळ्यावर मारून त्याला जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार भांगे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *