दापोडीत १५ हजारांच्या गांजासह एकाला अटक

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – दापोडी परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ हजार ४५० रुपयांचा ३०९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या सांगवी रोडवर करण्यात आली.
​याप्रकरणी पोलीस हवालदार नवनाथ पंडित पोटे यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उमेश अशोक राजपूत (वय ३२, रा. दापोडी) याला अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश एका खाकी रंगाच्या पिशवीतून १५ हजार ४५० रुपये किमतीचा ३०९ ग्रॅम गांजा घेऊन चालला होता. संशयावरून त्याची झडती घेतली असता हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक भास्कर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *