खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे महाप्रबंधकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक;
मावळातील रेल्वे प्रश्नांवर होणार प्रभावी अंमलबजावणी!
पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटकांना आणि रेल्वे प्रवाशांना होणारा पार्किंगचा त्रास आता कायमचा मिटणार आहे. रेल्वे स्थानकालगत असलेली उपलब्ध जागा वाहनतळासाठी विकसित करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले असून रेल्वे प्रशासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
📍 बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि मागण्या:
🅿️ भव्य पार्किंग: लोणावळा स्टेशन शेजारील मोकळ्या जागेत अद्ययावत पार्किंग सुविधा उभारणार.
🏖️ भुशी धरण व्यावसायिक: ४० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून देऊन त्यांचा रोजगार टिकवणार.
🚆 नवीन ट्रॅक व हायस्पीड रेल्वे: पुणे-लोणावळा चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती देणार; मुंबई-पुणे-बेंगळुरू हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा आराखडा तयार करणार.
🚉 एक्सप्रेस गाड्यांचे थांबे: कोरोना काळात बंद झालेले कर्जत येथील कोयना, सिद्धेश्वर, चेन्नई एक्सप्रेससह सर्व महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी.
🏛️ रेल्वे म्युझियम: लोणावळ्यातील २५ एकर जागेत भव्य ‘रेल्वे म्युझियम’ उभारणार.
🛣️ पूल व गेट: कामशेत येथे ओव्हर ब्रीज, सोमाटणे येथे अंडर पास आणि डोंगरगावचे रेल्वे गेट २४ तास सुरू ठेवणार.
💬 “स्थानिकांचे हित आणि प्रवाशांची सोय आमची प्राथमिकता!”
”लोणावळ्यातील पर्यटन वाढवण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रेल्वेच्या प्रलंबित कामांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला ठोस सूचना दिल्या आहेत.”
— श्रीरंग बारणे (खासदार, मावळ लोकसभा)
👥 बैठकीला उपस्थित मान्यवर:
आमदार सुनील शेळके, रेल्वे महाप्रबंधक हिरेशजी मीना, अपर मंडल रेल प्रबंधक निरज यादव, नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आणि इतर पदाधिकारी व रेल्वे अधिकारी.
#Lonavala #Maval #RailwayNews #ShrirangBarne #ParkingSolution #LocalTourism #MavalDevelopment #IndianRailways #PuneLonavalaLocal
