पिंपरी-चिंचवडमधील खाजगी शाळांच्या ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध ‘आप’ आक्रमक!

​पिंपरी-चिंचवड:- शहरातील खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. यासंदर्भात आपचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट आणि महासचिव स्वप्निल जेवळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

​🛑 शाळांच्या लुटीचा पाढा: प्रमुख आरोप
​RTE साहित्याची बेकायदेशीर विक्री: कायद्यानुसार मोफत मिळणारी पाठ्यपुस्तके, गणवेश आणि इतर साहित्य शाळा पालकांना पैसे घेऊन विकत आहेत.
​अपारदर्शक PTA निवड: पालक-शिक्षक संघाची निवड नियमानुसार सर्व पालकांच्या उपस्थितीत न करता, शाळा व्यवस्थापन आपल्या मर्जीतील लोकांची गुपचूप निवड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​अपात्र शिक्षकांचा सुळसुळाट: अनेक शाळांमध्ये TET उत्तीर्ण नसलेले किंवा पुरेशी शैक्षणिक पात्रता नसलेले शिक्षक शिकवत आहेत.

​RTE विद्यार्थ्यांकडून फी वसुली: २५% राखीव कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडूनही बिल्डिंग फंड आणि इतर उपक्रमांच्या नावाखाली बेकायदेशीरपणे हजारो रुपये उकळले जात आहेत.

​📢 आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
​१. शहरातील सर्व खाजगी शाळांची ३० दिवसांत तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमावी.
२. बेकायदेशीरपणे घेतलेली फी पालकांना परत मिळावी आणि दोषी शाळांवर दंडात्मक कारवाई व्हावी.
३. सर्व शिक्षकांची पात्रता आणि यादी शाळेच्या वेबसाईटवर जाहीर करणे बंधनकारक करावे.
४. गेल्या ३ वर्षांचे आर्थिक ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा.

​⚠️ इशारा: “जर या निवेदनावर १५ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा आपचे महासचिव स्वप्निल जेवळे यांनी दिला आहे.
​भ्रष्टाचार कायमचा गाडू, पर्याय फक्त झाडू! 🧹
​#PCMC #EducationScam #AAP #PimpriChinchwad #RTE #SchoolFees #AamAadmiParty #EducationReform #PuneNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *