तडीपार गुंडाला पिस्तुलसह अटक

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आरोपी बेकायदेशीररीत्या शस्त्र घेऊन फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
अनंता ऊर्फ ओंकार संताजी सोरटे (वय 22, रा. लोहर वस्ती, दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार रितेश माणिक कोळी यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनंता याला परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्तांनी जुलै 2025 मध्ये दोन वर्षांसाठी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांतून तडीपार केले होते. तरीही तो विनापरवाना दारुंब्रे-चांदखेड रोडवर वावरत होता. त्याच्याकडे 25 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि काडतूस मिळून आले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *