पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चाकणमधील मेदनकरवाडी परिसरात बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ४ मे) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
नकूल शंकर लोखंडे (वय १९, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झाल्यावर अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई अमोल पोपट माटे (वय ३४) यांनी मंगळवारी (दि. ५ मे) रोजी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असताना मेदनकरवाडी येथील सार्वजनिक रोडवर आरोपी नकूल लोखंडे हा संशयास्पदरीत्या आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्तुल आणि एक हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलीस आयुक्तांच्या हत्यार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.
चाकण परिसरात गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत
